Article published in Mouj, Divali issue, 2011

गेल्या दहापंधरा वर्षातील भारतीय संगीताची वाटचाल पहाता, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते़ ती म्हणजे, राग, ताल, तान, वगैरे सांगितिक शब्दांबरोबर मार्केटिंग‘, ‘पब्लिक रिलेशन्सअाणि नेटवर्किंगअशा काही संगीत बाह्य शब्दांनिही कलाकारांच्या भाषेत प्रवेश केला अाहे़ एवढेच नाही तर अाजचे काही कलाकार अापल्या श्रोत्यांना ग्राहक म्हणून अोळखतात़ अापली कला प्रस्तुति अशा ग्राहकांपर्यंत सोप्यात सोप्या प्रकारे अाणि कमीत कमी वेळात पोहोचवावी अाणि त्या प्रस्तुतिचा खपजास्तीत जास्त व्हावा या द्रष्टीने संगीत क्षेत्रात अापण अापले पाऊल कसे टाकले पाहीजे याचा विचार असे कलाकार सतत करत असतात़ रियाज व तालीम हे संगीत साधनेतील अविभाज्य घटक अाहेत हे जितके खरे अाहे, तेवढेच महत्वाचे किंबहुना त्याहुनही जास्त महत्वाचे हे संगीत बाह्य घटक अाहेत, असे ठाम मत राखणारे काही कलाकार अाढळतात़

कदाचित वाचकांना ही अतिशयोक्ती वाटेल किंवा परंपरेच्या नावाखाली कुठल्याही परिवर्तनाचा विरोध करणार्यांपैकी माझीही गणना होईल़ पण ही वस्तुस्थिति अाहे अाणि ती अोळखणे व तिची कारणे जाणून घणे अत्यंत गरजेचे अाहे़ कुठल्याही समाजात कला अाविष्काराचे महत्व किती अाणि का अाहे याची वाचकांना जाणीव अाहेच, त्यामळे या विषयावर फार काही लिहिण्याची अावश्यकता नाही़ी ़ थोडक्यात, कलेचे स्थान दैनंदिन जीवनातील वापरात येणार्या किरकोळ वस्तुंच्या बरोबरीचे करणे ही दु:खाची बाब अाहे, अाणि अशा परिस्थितिला कलाकारांनी शरण जावे ही तेवढीच निराशाजनक स्थिति अाहे़

संगीताचे व्यापारिकरण ही वर्तमान कालाची देणगी अाहे असे मुळीच समजायचे कारण नाही ़ राजेमहाराजे, शहरातील धनिक, संगीत संस्था, अाणि सर्व सामान्य जनता अशा सर्वांचा अाश्रय कलाकारांना वेगवेगळ्या कालखंडात मिळाला अाहे़ अर्थात, हा अाश्रय कधी बिदागीच्या स्वरूपात प्राप्त झाला तर कधी देणगीच्या़ ह्या शिवाय काही कलाकार नाटक अाणि सिनेमा कंपनीत नोकरी करु लागले, काहिंनी ध्वनिमुद्रिकांवर अापले नाव उमटवले, अाणि पुढे काही अाकाशवाणी व दूरदर्शनवर नोकरी करु लागले़ काहिंची संगीत विद्यालयात, शाळात अाणि विद्यापिठात संगीत शिक्षक म्हणून वर्णी लागली ़ या सर्व भूमिका पार पाडताना पैशाची देवाण घेवाण होत होती ़ संगीत म्हणजे निव्वळ अाध्यात्म अाणि या क्षेत्रात पैशाचे मोजमाप झालेले नाही असे गृहित धरणारे बरेच लोकं अाहेत़ पण इतिहासाच्या पाउलखुणा वेगळेच द्रष्य उभे करतात़ कलाकार हा समाजातच वावरतो अाणि त्याच्या भौतिक गरजा इतर लोकांसारख्या असतात, तेव्हा अापल्या कामाबद्दल मोबदला मिळणे ही लाजिरवाणी गोष्ट नसून ते स्वाभाविक अाहे़

तरी, अाधी उल्लेख केल्याप्रमाणे अाजची परिस्थिति वेगळी अाहे़ या बदललेल्या वातावरणाच्याबद्दल काही विचार मांडण्याचा प्रयत्न इथे करीत अाहे़

गेल्या दोन दशकात अांतरराष्ट्रीय अार्थिक व्यवस्था अाणि तंत्रज्ञान या दोहोंनी संपूर्ण जगाला जवळ अाणले अाहे़ राजकारणी अाणि भौगोलिक सीमा असूनही अाज वेगवेगळ्या देशातील अंतर कमीकमी झालेले अनुभवायला मिळते़ ही जागातिकिकरणाची प्रक्रिया निश्चितच विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक संवाद, वगैरे बाबतीत लाभदायक ठरली अाहे़ अाज घरबसल्या अापण इंटरनेटवरून इतर देशातील संगीत पद्धतींबद्दल वाचू शकतो व वेगवेगळ्या कलाकारांच्या प्रस्तुतिंचा अास्वाद घेऊ शकतो़ इतकेच नव्हे तर इमेल, फेसबुक अाणि ट्विटर या माध्यमांमुळे इतर देशातील कलाकारांबरोबर संवाद साधण्याची संधीही मिळू शकते़

एवढी साधने असूनही जागातिकिकरणाचा फायदा पाश्चिमात्य देशातील कलाकारांना जास्त झाला अाहे कारण जागातिकिकरणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पैशाचा पुरवठा लागतो जो पाश्चिमात्य देशातील कलाकारांना जास्त सोप्या रितिने प्राप्त होतो़ सांगितिक संवाद हा इंटरनेटवरून होऊ शकतो पण त्या पलीकडे प्रत्यक्ष भेटीत खूप काही अनुभवायला मिळते़ अशा प्रत्यक्ष भेटींसाठी अार्थिक पाठबळ अनिवार्य अाहे़ इंटरनेटवरून अॉडियो फाइल्स पाठविण्याची जरी सोय असली तरी प्रत्यक्ष गाठीभेटी होणे गरजेचे अाहे़ त्यामुळे कुठलाही अांतरराष्ट्रीय सांगितिक संवादाचा विचार लहानात लहान देशातर्फे सुरू होऊ शकतो पण त्याला अार्थिक पाठबळ नसले तर त्या संवादाचा परिणाम जसा अपेक्षित असतो तसा क्वचितच होतो़ पाश्चिमात्य देशांतील कंपन्या, सांस्कृतिक संस्था, वगैरेंचा अार्थिक पाठिंबा त्या देशातील कलाकारांना जितका मिळतो तितकासा अापल्याकडे मिळत नाही़ी ़ अर्थात, त्या देशातही कला व कलाकारांना जेवढा मान मिळायला पाहीजे तेवढा मिळत नाही अाणि सांस्कृतिक कार्यांसाठी ितथल्या शासनाचा पाठिंबा कमीकमी होत चालला अाहे़ तरी त्यांच्या तुलनेत भारतात तेवढासा पाठिंबा दिसत नाही ़ ह्या शिवाय अापल्याकडच्या कंपन्या, मग ते भारतीय असो किंवा मल्टिनॅशनल असो, यांचा कल मुख्यत: बोलिवुड संस्कृतिकडेच असतो़ थोडक्यात, ज्याचे अार्थिक बळ जास्त, तो सांस्कृतिक संवाद साधू शकतो अाणि त्या संवादाचा अाराखडा ही अाखू शकतो, ही अाजची परिस्थिति अाहे़

या अाधी, काही शतकांपासून कलाकारांनी अापल्या मूळ देशापलीकडे जाऊन इतर देशातील संगीत पद्धतींचा अभ्यास केला व त्या पदधतींच्या काही गोष्टींचा अापल्या संगीतात समावेश केला़ त्या काळातील सांस्कृतिक संवादासाठी देखील अार्थिक पाठबळाची गरज होती व ती खुपश्यावेळी राजाश्रयामुळे पार पडली ़ पण अाजचा अांतरराष्ट्रीय सांस्कृतिक संवाद वेगवेगळ्या पातळींवर होतो़ अाता प्रत्येक देशातील बाजारातील मागणी पुरवठा ही कला अाणि कलाकारांपेक्षा जास्त महत्वाची ठरते़ उदाहरणार्थ, कुठल्या देशातील संगीताचे ध्वनिमुद्रणे भारतात सहजपणे ऐकायला मिळतील हे रेकॉर्ड लेबलसचे मार्केटिंग एक्झेक्युटिवस् ठरवणार ़ या मार्केटिंग एक्झेक्युटिवस् चा संगीताशी कुठलाही संबंध नसूनही असे निर्णय ते बेधकपणे घेऊ शकतात़ कारण त्यांच्या निर्णयामागे सांगितिक तर्क नसून बाजार व व्यापारिकरणाचे तर्क असतात़ तसेच, कुठल्या अांतरराष्ट्रीय कलाकारांचे कार्यक्रम अापल्या देशात करायचे हे ही येथील इव्हेंट मॅनेजरस् ठरवतात आणि त्यांचे निर्णयही प्रायोजकांवर अवलंबून असतात़

जागातिकिकरणामुळे फ्युजन अाणि वर्लड म्युझिक यांचा बोलबाला झाला अाहे़ वेगवेगळ्या संगीत प्रकारांचा एकमेकांशी संवाद साधणे यालाच फ्युजन हे नाव दिलेले अाहे़ भारतीय कलाकारांना परदेशात फ्युजन कार्यक्रमांसाठी निमंत्रणे मिळतात अाणि भारतात येणार्या इतर देशातील कलाकारांसोबत प्रस्तुति करण्यासाठीही संध्या मिळतात़ असे असून अाजवर अापल्या संगीत शिक्षणात इतर देशातील संगीत प्रकार शिकविले जात नाही़ीत ़ एवढेच नव्हे तर या बाबतीत फारशी चर्चा देखील होत नाही़ी ़ देशाभिमान राखणारे कलाकार परदेशातील विद्यापिठात भारतीय संगीतावर कार्यशाळा चालवतात पण त्या देशातील संगीत प्रकारांबद्दल काहीच कुतुहल दाखवित नाहीत़ ही खेदाची गोष्ट अाहे पण यात फारसे काही नवल नाही कारण अापण भारतातील संगीत प्रकारांचीच माहिती अापल्या विद्यार्थ्यांना देत नसतो तर इतर देशांच्या संगीताचे काय! असो़

प्रत्येक वस्तु ग्राहकांकडे सोप्या तर्हेने पोहोचली पाहिजे हे अाजच्या जागातिकिकरणाच्या युगाचे ब्रीद़ हे संगीत क्षेत्रातही तेवढेच खरे ठरते़ वर्लड म्युझिक ही संज्ञा एवढ्यासाठीच जगप्रसिद्ध झाली ़ पाश्चात्य देशातील ध्वनिमुद्रिकांच्या दुकानात डोकावून पाहिल्यास एक गोष्ट लगेच नजरेस पडते़ ती ही की पाश्चात्य संगीत प्रकारांच्या व्यतिरिक्त असणारे ध्वनिमुद्रिका एकाच वर्गात ठेवलेल्या मिळतात़ यालाच वर्लड म्युझिकची संज्ञा दिलेली अाहे़ याचा अर्थ, पाश्चात्य संगीतातील प्रकारांची ओळख ठेवली जाते पण इतर देशातील संगीत प्रकारांची ओळखच नव्हे तर देशांची नावे न देता त्या सर्वांना एकाच वर्गात बसवले जाते़ तर जागातिकिकरणामुळे माहित झालेले सांस्कृतिक वेगळेपण व सौंदर्य हे नंतर एकाच साच्यात बसवले जाते़

वर्लड म्युझिकच्या अंतरगत जगातील सांगितिक विविधता नाहिशी होत अाहे पण त्याचबरोबर पारंपरिक संगीताचे अंश अाजच्या युगातील इलेक्ट्रॉनिक संगीताबरोबर वरच्यावर वापरले जातात़ हा वापर खूपदा नाविन्य अाणण्यासाठी किंवा प्रस्तुतिला अांतरराष्ट्रीय स्वरूप व किर्ती देण्याकरिता केला जातो़ नवीन प्रयोग कलाकारांसाठी शिक्षणाचे माध्यम होऊ शकतात पण बाजारात अापले वरचस्व राखण्यासाठी प्रयोग केले तर त्या प्रयोगांची सौंदर्य द्रष्टी सिमित वाटते़

ध्वनिमुद्रणांच्या क्षेत्रात वस्तुस्तिथी अशी अाहे की बर्याच ध्वनिमुद्रणांचे बौधिक हक्क (इटेलेक्चुअल प्रॉपरटी राइटस्) बड्या अांतरराष्ट्रीय कंपन्यानकडे अाहेत़ खूपशा कलाकारांना अापल्या हक्कांची जाणीव नसल्यामुळे ते अापल्या प्रस्तुतिंवरचे संपू्र्ण हक्क या लेबलसच्या स्वाधीन करतात व त्याचा त्यांना एकाच घटक्यात मोबदला मिळतो़ यामुळे भविष्यात त्यांच्या प्रस्तुतिंचा वापर कठे व कसा केला जाईल या निर्णयावर त्यांचा काहिच अधिकार राहात नाही ़ मग तो वापर रिंगटोन अाणि कॉलर ट्यून मध्ये असो का जाहिरातीत़ याचा परिणाम पारंपरिक संगीतावर असा होतो की अशा संगीत प्रकारांचे ध्वनिमुद्रणे बर्याचदा कसेही वापारले जातात व ह्या उपयोगाचा फायदा रेकॉर्ड लेबलस् यानाच मिळतो़

अांतरराष्ट्रीय स्थरावर अशी परिस्थिती असताना तिचा परिणाम भारतात दिसणे सहाजिकच अाहे़ मार्केटिंग, पब्लिक रिलेशनस् अाणि नेटवर्किंग या गोष्टींचा भारतीय कलाकारांवर प्रभाव पडला अाहे तो या परिस्थितीमुळेच पण त्याचा परिणाम संगीतावर ही होतो़ अापल्या संगीताची प्रस्तुति सौंदर्यस्थळांचा विचार न करता बाजारातील मागणी पुरवठ्याच्या अनुशंगाने करायची हे अाज बर्याच कार्यक्रमांत व ध्वनिमुद्रिकांत अनुभवायला मिळते़ बाजारात नाविन्य सारखे लागते मग ते वरवरचे का होईना़ संगीतातही नाविन्याच्या मागे धावणारे बरेच कलाकार दिसतात पण भारतीय संगीत परंपरा ही शतकांपासून सम्रुद्ध होत अाली अाहे याची दखल घेतली पाहिजे़ संगीतात नाविन्य अाणायचे किंवा खरोखर सृजनात्मक काम करायचे हे अापल्या संगीत परंपरेत किती कठीण अाहे हे ज्याला परंपरेची अोळख अाहे तोच समजू शकेल़ अापली प्रस्तुति अाणि सृजन हे जगा वेगळे अाहे व या अाधी असे कधी घडले नाही अशा दाव्यांमागे बाजारावर अापला ताबा चांगला बसला पाहिजे हा विचार असतो़ बाजाराची स्पर्धावृत्ती कलाकारांवरही परिणाम करते याचे हे उत्तम उदाहरण़

अाज प्रत्येक माध्यमावरून सिनेसंगीताचा जेवढा प्रसार होतो तेवढा इतर कुठल्याही संगीत प्रकाराचा होत नाही़ी ़ भारतीय संगीताची विविधता ही सिनेसंगीताच्या प्रसारामुळे नाहिशी होत अाहे़ या प्रसाराचे कारण म्हणजे सिने सृष्टीत गुंतलेला पैसा अाणि त्यातून अपेक्षित असलेला फायदा़

अशा परिस्थितीत भारतीय संगीताचे व कलाकारांचे भवितव्य काय? ह्याचे उत्तर अापण सर्वांनी शोधले पाहिजे़ संस्कृतिचा प्रश्ण हा नुस्ता कलाकारांचा नसून तो संपूर्ण समाजाचा अाहे़

जागातिकिकरणाचा व तंत्रज्ञानाचा फायदा कलाकारांनी घेतलाच पाहिजे पण त्या सोबत त्यांनी अापल्या परंपरांचा व इतर संगीत प्रकारांचा अभ्यास केला पाहिजे़ परंपरेचा व अाजच्या युगातील प्रयोग या दोन्ही गोष्टींचा सखोल अभ्यास अापल्या संगीत शिक्षणात झाला पाहिजे़ भारतातील इतर प्रांतात व इतर देशांना फक्त अापल्या व्यावसायिक जीवनाचे अंग न समजता त्यांच्या संस्कृतिचा डोळसपणे अभ्यास करण्याची अावश्यकता अाहे़ अापल्या बौधिक हक्कांची जाणीव असणे हे गरजेचे अाहे पण त्याचबरोबर अापल्या संगीताबद्दल जबाबदारी बाळगणे हेही महत्वाचे अाहे़ अापली कला प्रस्तुति किती इमानाने करतोय याची सतत काळजी घेणे हे कलाकारांचे कर्तव्य अाहे़ त्याचबरोबर प्रायोजकांनी व संगीत प्रमी जनतेनेही संगीताची विविधता जपणे महत्वाचे अाहे़

Site Footer